राज्यातील या शहरांमध्ये पेट्रोल 'शंभरीपार' !

औरंगाबाद, जळगाव उंबरठ्यावर  
राज्यातील या शहरांमध्ये पेट्रोल 'शंभरीपार' !

औरंगाबाद - Aurangabad :

गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलचे दर नियमित वाढत आहेत. परभणीत पेट्रोलचे दर १०० रुपयांवर गेल्यानंतर गेल्या दोन दिवसांत नांदेड आणि बुलडाणा या दोन शहरातही पेट्रोलचे दर १०० रूपयांपर्यंत पोहोचले आहे.

ही दर वाढ कायम राहिल्यास औरंगाबाद जिल्ह्यासह अन्य सात जिल्ह्यांतील पेट्रोलचे दर शंभर रूपये प्रतिलिटर आकड्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पाच राज्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून थांबलेल्या इंधन दरवाढीने पुन्हा वेग घेण्यास सुरवात केली आहे.

४ मे २०२१ पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत चालले आहे. औरंगाबादमधील पेट्रोलचे दर ९७ रूपये ९७ पैसे प्रतिलिटर पेट्रोल होते.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत पेट्रोलचे दर १ रूपये ६९ पैसे पेट्रोल महाग झालेले आहे. तर गेल्या आठ दिवसांत डिझेलच्या दरात २ रूपये १० पैसे दराने वाढ झालेली आहे. डिझेलचे सध्याचे दर ९१ रूपये ०५ पैशांनी वाढले आहेत.

सध्या पेट्रोलच्या किमती वाढत असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९९.६६ पर्यंत पोहोचले असून आगामी काही दिवसात पेट्रोलचे दर शंभरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. शहरात यापूर्वी २०१८ ला ऑक्टोबर महिन्यात ९२ रूपये ७४ पैसे प्रतिलिटर पेट्रोल विकण्यात आले होते.

ही दरवाढ विक्रमी झाली होती. वर्ष २०१८ नंतर वर्ष २०२१ मध्ये मे महिन्यात पेट्रोलचे दर विक्रमी ९९ रूपये ६६ पैसे पर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात ही दरवाढ कायम राहिल्यास औरंगाबादेत शंभरच्या वर पेट्रोलचे दर जाण्याची शक्यता आहे. सध्याही एक लिटर पेट्रोलसाठी ग्राहकांना शंभर रूपयेच द्यावे लागत आहेत.

औरंगाबाद - ९९.६६

अमरावती - ९९.८५

बीड - ९९. ४३

गोंदीया - ९९.६८

लातूर - ९९.४५

हिंगोली - ९९.३३

जळगाव - ९९.५९

जालना - ९९.५४

लातूर - ९९.४५

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com