आजपासून पहिली ते आठवीचा अभ्यास दूरदर्शनवर
महाराष्ट्र

आजपासून पहिली ते आठवीचा अभ्यास दूरदर्शनवर

शाळा बंद, पण शिक्षण सुरू

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai - दूरदर्शनच्या (Doordarshan) सह्याद्री वाहिनीवर(Sahyadri TV channel) इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण देणारी टिली-मिली Tilly Milly ही विशेष अभ्यास मालिका आजपासून प्रसारीत होत आहे. सकाळी 7.30 ते दुपारी12.30 वाजेपर्यंत ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. बालभारतीच्या इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमातील सर्व पाठांवर आधारित ही मालिका आहे.

देशात करोना संकटामुळे 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून सर्व शाळा बंद आहेत. काही शाळांनी ऑनलाईन वर्गांना सूरुवात केली आहे. पण देशात असणार्‍या अनेक समस्यांमुळे अनेकांना डिजिटल शिक्षण घेणे शक्य नाही. कारण स्मार्ट मोबाइल, इंटरनेटअभावी अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला. म्हणूनच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (एमकेसीएल) Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL) या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी टिली-मिली नावाची मालिका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

मालिकेचे एकूण 480 भाग आहेत. प्रत्येक इयत्तेचा एक पाठ एका भागात असेल. प्रत्येक इयत्तेचे एकूण 60 भाग दाखवण्यात येणार आहेत. रविवारी मालिका दाखवण्यात येणार नाही.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे यावर्षी शाळा सुरु होताहेत की नाही याची चिंता आहे. ऑनलाईन शिक्षण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याने शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, रविवारी वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

टिली-मिली मालिका मुलं आपल्या पालकांसोबत घरी बसून पाहू शकतील. शिवाय यातील भागांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शिकवणार्‍या काही व्यक्तींबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे.

वेळ - इयत्ता

सकाळी 7.30 ते 8.00 - आठवी

सकाळी 8.00 ते 8.30 - सातवी

सकाळी 9.00 ते 9.30 - सहावी

सकाळी 9.30 ते 10.00 - पाचवी

सकाळी 10.00 ते 10.30 - चौथी

सकाळी 10.30 ते 11 - तिसरी

सकाळी 11.30 ते दुपारी 12 - दुसरी

दुपारी 12 ते 12.30 - पहिली

डीडी सह्याद्रीच्या टाटा स्काय 1299, एअरटेल - 548, डिश टीव्ही - 1229, व्होडाफोन डी 2 एच - 769, डीडी फ्री डिश - 525, हॅथवे - 513, जेपीआर- 561 या चॅनेलवर या मालिकेचे प्रसारण होणार आहे. रविवारी या आनंददायी शाळेला सुट्टी असणार आहे. 1 ली ते 8 वीचा बालभारतीचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम या शाळेतून शिकवला जाणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com