शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक

शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक

पुणे (प्रतिनिधी) -

शुन्य टक्के व्याजदराने बँकेतून कर्ज देण्याच्या आश्वासन देऊन कर्ज न देता प्रोसेसींग स्वरूपात पैसे घेऊन 1 लाख 37 हजारांची फसवणूक

केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मनिषा अमोल नाळे (40, नानापेठ,पुणे), यशोदा दिलीप पवार (रा.दिघी,पुणे) आणि प्रत्युष सुनिल नलावडे (35, कल्याणीनगर,पुणे) यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत रामदास धनीराम काची (38, रा. विश्रांतवाडी,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपीने फिर्यादीच्या बहीणीस बँकेतून शुन्य टक्के व्याजाने कर्ज काढून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्वतःकडील सही शिक्के असलेले ओळखपत्र दाखवून 15 दिवसांत कर्ज मिळेल असे सांगून फिर्यादीकडून प्रोसेसिंग फी स्वरूपात काही रक्कम रक्कम घेतली. सात लाख कर्ज मिळाल्यास 42 हजार प्रोसेसींग फी द्यावी लागेल सांगून आरोपी यशोदा पवार हिच्या युनियन बँकेतील खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानुसार काची यांनी वेळोवेळी संबंधीत खात्यावर रक्कम भरली.

त्यानंतर काची यांनी कर्जाबाबत विचारणा केली असता आरोपी मनिषा नाळे हिने ती बँकेची लिलाव एजंट असून लिलावाकरीता तिच्याकडे गाड्या असल्याचे सांगितले. तसेच 55 हजार रूपये भरले तर स्विफ्ट कार अणि 40 हजारात दोन अ‍ॅक्टीवा गाड्या लिलावात देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी 95 हजार रूपे प्रतुष याच्या बँक खात्यावर भरण्यास सांगितल्यानंतर ते फिर्यादी यांनी जमा केल्यावर कर्जाचा पाठपुरावा केला असता आरेापी नाळे हिने त्यांना वेगवेगळी कारणे सांगून कर्ज मंजूर केले नाही. तसेच लिलावातील वाहने देखील दिली नाही. काची यांनी दिलेले पैसे परत मागितले असताना शिवीगाळ व धमकी देऊन संगणमताने 1 लाख 37 हजार रूपये रकमेचा अपहार करून फसवणूक केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com