
पिंपरी चिंचवड | Pimpri Chinchwad
येथील चिखली परिसरातील (Chikhali Area) पूर्णा नगरमध्ये एका हार्डवेअरच्या दुकानांला (Hardware Stores) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू (Death) झाला असून मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,आज बुधवार (दि.३०) रोजी पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली असून या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे गाढ झोपेत असतांना या कुटुंबाला स्वत:चा जीव वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही. चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (१०) व भावेश चौधरी (१५) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे. तसेच ही आग नेमकी कशी लागली? याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात आला आहे.