मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

मुंबई | Mumbai

भाजपचे (BJP) नेते किरीट सोमैया यांच्या (Kirit Somaiya) गाडीवर शनिवारी हल्ला करण्यात आला होता. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमैया जखमी झाले होते.

दरम्यान या प्रकरणात मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांना पोलिसांनी अटक केली आहे. खार पोलिसांनी आज साडे चार वाजण्याच्या सुमारास महाडेश्वर यांना अटक केली.

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

तसेच शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक दिनेश कुबल, हाजी आलम, शेखर वायगंणकर यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी हल्ल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार या प्रकरणात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

नेमकं काय घडलं होत?

राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या २३ एप्रिलला खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच देखील फुटली आणि किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले.

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक
गुलाबाची कळी....! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

Related Stories

No stories found.