माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

८९ व्या वर्षी त्यांनी करोनावर मात करत सर्वांना सुखद धक्का दिला होता

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज निधन झाले. पुणे येथे पहाटेच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांना करोनाची लागण झाली होती पण ९१ व्या वर्षी त्यांनी करोनावर मात करत सर्वांना सुखद धक्का दिला होता.

अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला. तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. १९८५ - ८६ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. १९९० - ९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते.ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com