भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांना करोनाची लागण

भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांना करोनाची लागण

पुणे l प्रतिनिधी l Pune

भारतीय जनता पक्षाचे नेते व पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांनी स्वतः

फेसबुक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळल्यानंतर, माझी चाचणी करण्यात आली आणि माझा अहवाल पोझिटीव आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. असं शिरोळे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये सांगितलं आहे.

तसेच गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वानी कृपया लक्षणे आढळल्यास तुरंत चाचणी करावी, आणि विलगीकरण बाळगावे अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com