'तो' पुन्हा येणार! 'या' भागात कोसळणार मुसळधार पाऊस

पाऊस
पाऊसRain

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtr) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. दिवसभर ऊन आणि संध्याकाळी जोरदार पाऊस (Rain) अशी परिस्थिती अनेक ठिकाणी बनली आहे. आता विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे...

तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गुरुवारपासून पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सर्वाधिक 110 मिलिमीटरची नोंद झाली आहे. आज विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, तळकोकणात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान, उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, उद्या बुधवार दि.७ पासुन पुन्हा पुढील ८ दिवस म्हणजे दि.१४ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात वीजा व गडगडाटीसह मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

आज रात्रीपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर पुढील तीन दिवस अधिक राहू शकतो, नाशिक खान्देशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com