दहीहंडीच्या सणाला यंदा प्रथमच मुंबई सुनसान
महाराष्ट्र

दहीहंडीच्या सणाला यंदा प्रथमच मुंबई सुनसान

Kishor Apte

Kishor Apte

मुंबई |प्रतिनिधी

करोनामुळे गेल्या मार्च पासून सार्वजनिक जीवनावर गदा आली असताना मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख असलेल्या दहीहंडीच्या सणाला यंदा प्रथमच मुंबई सुनसान दिसत होती.

दुसरीकडे कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. मुंबईतील सार्वजनिक आणि घरगुती अशा जवळपास पाचशेपेक्षा जास्त दहीहंडी रद्द करण्यात आल्या आहेत.

गोविंदा पथक वाजत गाजत, दहीहंडी फोडण्यासाठी शहरभर फिरत असतात. मात्र, यावर्षी जवळपास सर्वच दहीहंड्या रंद्द करण्यात आल्या. विशेष म्हणजे काही भागांमध्ये गोविंदा पथकांकडून मेडिकल किटचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com