मुसळधार पावसाने कोकणात पूरस्थिती! रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी... चिपळूणमध्ये NDRF टीम तैनात

मध्य रेल्वेची सेवा ठप्प, हार्बर लोकल सेवा विस्कळीत
file photo
file photo

मुंबई | Mumbai

सध्या कोकण पट्टयात मुसळधार पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, परिणामी पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहतायत. त्यामुळे पूर सदुश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला असून, पाताळंगा नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्याकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे असे परिपत्रक देखील काढण्यात आलं आहे. सावित्री, कुंडा, पात्रगंगा, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान नाशिक महामार्गावर शहापूर ते आसनगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत. नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन मध्ये खड्ड्यामध्ये एक गाडी आदळून बंद पडली. त्यामुळे रस्ता ब्लॉक झाला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेंनवर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत खानदेशातील नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक पाऊस होता. तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील हार्बर मार्गावर पनवेल स्थानकात पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलहून बेलापुरच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक खोळंबली आहे. तर अंबरनाथहून बदलापुरकडे जाणारी रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळं सीएसटीकडे येणाऱ्या प्रवाशांना कामासाठी जाण्यास उशीर होत आहे. त्यामुळं अनेक प्रवाशांना रेल्वे सोडून सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. रात्री उशीरापासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी लोकल सेवा ठप्प झाली असून काही गाड्या १५ ते २० मिनिटांच्या उशीराने धावत असल्याची माहिती आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com