
पुणे (प्रतिनिधी) - पुण्यातील येरवडा कारागृहातील तात्पुरत्या कारागृहातून गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या पाच कैद्यांनी खिडकीचे गज कापून गुरुवारी पाहते चारच्या सुमारास पलायन केले. येरवडा तात्पुरत्या कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही चौथी घटना घडली आहे. करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीन बंदी तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येत आहेत. वारंवार बंदी पळून जाण्याच्या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे. तर इतर दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कैद्यांपैकी तिघे जण दौंड तालुक्यातील आहेत, एक कैदी पुणे शहरातील आणि एक हवेली तालुक्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी दौंड, वाकड आणि हवेली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेल्या आरोपींमध्ये देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश आजिनाथ चव्हाण( दोघेही रा. बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे अक्षय कोडक्या चव्हाण, ( रा. लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे), अजिंक्य उत्तम कांबळे (रा. सहकार नगर टिळेकर वाडी), देवगन गणेश अक्षय हे तीनही आरोपी दौंड पोलिसांनी मोक्याच्या पुण्यात अटक केलेले आहेत. अजिंक्य याच्यावर लोणीकाळभोर तर सनी याच्यावर वाकड पोलिस स्टेशन येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत
करोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयाच्या आवारात तात्पुरते कारागृह करण्यात आले आहे. या आवारातील चार क्रमांकाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 5 मध्ये हे पाच जण त्यांनी रात्रभर खिडकीचे गज कापून व गज उचकटून पलायन केले. गुरुवारी पहाटेचारच्या सुमारास हा परके घडला
येरवडा तात्पुरत्या कारागृहात सध्या एकूण 568 आरोपींना ठेवण्यात आले आहे. मध्यंतरी दोन आरोपींनी पलायन केले होते. बंदी पळून जाण्याच्या वारंवार होणार्या घटनांमुळे सध्या पुणे पोलीस आयुक्तालय कडील दोन अधिकारी, बारा कर्मचारी, काराग्रह विभागाचा एक अधिकारी व 18 कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र तरीदेखील बंदी पळून जाण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.