Video : मुंबईत भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू, सहा जखमी
मुंबई | Mumbai
वरळी सी लिंकवर (Worli Sea Link) एक भीषण अपघात (Accident) झाला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत...
वरळी सी लिंकवर थांबण्यास मनाई असताना काही गाड्या सी लिंकवर थांबल्या होत्या. त्यानंतर मागील बाजूने वेगाने आलेल्या वाहनाने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.
हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात भीषण पद्धतीने झाला आहे.
पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. अपघातात पाच जण ठार तर सहा जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर वरळी सी लिंकवर मोठा गोंधळ उडाला होता. पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.