रुग्णवाहिका
रुग्णवाहिका
महाराष्ट्र

करोना लढ्यासाठी आता ही नवी फाैज

५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

राज्यात करोना संकट अधिकच गंभीर होत असतांना यावर शासनाकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना सुरू आहे. रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पोहचता यावेत म्हणुन राज्यासाठी ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यात नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. याकरिता लागणार्‍या ८७ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकिंय मान्यता देखील देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्या करोना रुग्ण व संशयितांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरवितांना राज्यातील रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरविल्या जातात. यातील बरीच वाहने जुनाट व नादुरुस्त असुन त्या दुरुस्ती योग्य नाही. परिणामी ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी येत आहे. ही बाब लक्षात घेता उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पींय अधिवेशनात नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा केली होती.

याच पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ या अर्थिक वर्षात ४८६ नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यास प्रशासकिंय मान्यता खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली होती. यानुसार शासनाकडुन आता करोनाच्या पार्श्वभूमीवर आता शासनाने जुन्या रुग्णवाहिका काढुन नवीन 500 रुग्णवाहिका खरेदी करण्यास (दि.१७) जुलै रोजी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात सर्वदूर पोहचलेल्या करोना बाधीत रुग्ण किंवा संशयितांना तात्काळ उपचार मिळणास मोठी मदत होणार आहे.

अशा उपलब्ध होणार रुग्णवाहिका

* जि. प. प्राथमिक आरोग्य केंद्र - 253

* ग्रामीण रुग्णालये - 137

* जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये - 106

* प्रादेशिक मनोरुग्णालये - 4

Deshdoot
www.deshdoot.com