बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठीची  अर्थसाह्य योजना बंद
महाराष्ट्र

बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठीची अर्थसाह्य योजना बंद

राज्य सरकारच्या उद्योग, कामगार विभागाचा निर्णय

Dnyanesh Dudhade

Dnyanesh Dudhade

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

राज्यातील इमारत आणि अन्य बांधकाम कामागरांना मंडळातंर्गत नोंदणीनंतर अवजारे- हत्यारे खरेदीसाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची योजना उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाच्यावतीने राबविण्यात येत होती. ही योजना शुक्रवार (दि.14) पासून बंद करण्यात आली आहे.

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, 1996 मधील कलम 22 मधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी योजना तयार करण्याची तरतुद आहे. त्यानूसार बांधकाम मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगांरास नोंदणीनंतर लगेच हत्यारे-अवजारे खरेदीसाठी पाच हजारांचे अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु होती. मात्र, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 13 फेबु्रवारीच्या बैठकीत ही योजना बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे आता ही योजना बंद करण्यात आली असल्याचे राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्यावतीने शासन निर्णयानूसार कळविण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com