बांधकाम कामगारांना तीन हजाराचा दुसरा हप्ता

10 लाख कामगारांना मिळणार लाभ
बांधकाम कामगारांना तीन हजाराचा दुसरा हप्ता

मुंबई | Mumbai -

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय (जिवित) बांधकाम कामगारांना तीन हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. Dilip Walse Patil या निर्णयाचा फायदा राज्यातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून सदर अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले. Construction Workers

कोविड -19 या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत 2 हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल 2020 मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै 2020 पर्यंत राज्यातील 9 लाख 14 हजार 748 बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने 183 कोटी रुपये खर्च केले.

सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापी, इमारत व इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना 3 हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला अशी माहितीही त्यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com