Maharashtra Congress : काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्ये तुफान राडा: विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यासमोरच दोन गट भिडले

Maharashtra Congress : काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्ये तुफान राडा: विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यासमोरच दोन गट भिडले

नागपूर | Nagrpur

विदर्भ काँग्रेसमधील (Vidarbha Congress) अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आज नागपूर शहर काँग्रेसची (Nagpur City Congress) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी नागपूरच्या सहा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार होता. मात्र, भाषण करण्यावरून दोन नेत्यांमध्ये राडा झाल्याने हा सगळा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत व्यासपीठावर उपस्थित होते...

Maharashtra Congress : काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्ये तुफान राडा: विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यासमोरच दोन गट भिडले
Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बैठक सुरू झाल्यावर काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thackeray) हे भाषण संपवत असताना काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र जिचकार (Narendra Jichkar) यांच्यासोबत बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही बाजूकडील समर्थक आपआपसात भिडले. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली आणि कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते.

Maharashtra Congress : काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्ये तुफान राडा: विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यासमोरच दोन गट भिडले
ठरलं! यंदाही शिवतीर्थावर ठाकरेंचीच तोफ धडाडणार; दसरा मेळाव्यास परवानगी

तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नुकतेच कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्याविषयी एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी बैठकीवेळी निषेध केला. आणि तुम्ही इथे आलात कसे? असा जाब विचारला. तर दुसरीकडे एका नेत्याने यावेळी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर या वादाचे रूपांतर राड्यात झाल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Congress : काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्ये तुफान राडा: विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यासमोरच दोन गट भिडले
भुजबळांची कबुली, शरद पवारांवरील 'ते' आरोप ठरले खोटे; नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

दरम्यान, नागपूर शहर काँग्रेसमध्ये आधीपासूनच दोन गटांमध्ये पक्ष विभागला गेला आहे. माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि दुसरा राऊत-चतुर्वेदी गट आहे. काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद आज पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आला. मात्र या प्रकारची कुठलीही बाचाबाची किंवा धक्काबुक्की झाली नसून कार्यकर्त्यांतील जोश या निमित्ताने दिसून आल्याचे काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांचे म्हणणे आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com