कंडारी येथील शेतकर्‍याची आत्महत्या
महाराष्ट्र

कंडारी येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Balvant Gaikwad

जळगाव  – 

तालुक्यातील कंडारी येथील शेतकर्‍यांनी शेतात पिक फवारणीचे औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी शेतात उघडकीस आली.

याप्रकरणी नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आबासाहेब अमृतराव कंडारी (वय-52) रा. कंडारी ता.जळगाव यांनी कंडारी शेत शिवारातील आपल्या शेताच्या बाजूला असलेल्या शेतात पिक फवारणीचे औषध घेवून आत्महत्या केली. हा प्रकार दुपारी शेतमजूरांच्या लक्षात आल्याने उघडकीस आला.

पोलीस पाटील कैलास रामचंद्र सुर्वे यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी आबासाहेब यांनी शेतासाठी खासगी पतपेढीकडून एक लाखाचे कर्ज घेतले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी शिला, दोन मुले प्राध्यापक राहूल कंडारी, अतुल कंडारी असा परीवार आहे. पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com