गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धिंगाणा, चाहते थेट स्टेजवर चढले

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धिंगाणा, चाहते थेट स्टेजवर चढले

बीड | Beed

गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमांना गर्दी होणे हे काही नवीन नाही. आता तिच्या एका कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढत राडा घातला आहे...

बीडमध्ये (Beed) गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राजुरी येथील एका वाढदिवसानिमित्त तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमीचा डान्स पाहायला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी गौतमीचे चाहते इतके अनियंत्रित झाले की शेकडो लोक थेट गौतमी नाचत असलेल्या स्टेजवरच चढले. यादरम्यान स्टेजवर दगडफेकदेखील करण्यात आली.

दरम्यान, गौतमी पाटील (Gautami Patil) ही लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याचा आरोप तिच्यावर झाला होता. यामुळे ती सर्वत्र चर्चेत आली होती. तरीही तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. नुकताच तिच्या एका कार्यक्रमात एका शाळेचा छत तुटले होते, तर एकाचा मृत्यूदेखील झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com