दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण

मुंबई - शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त म्हणजेच सवलतीच्या गुणांसाठी पात्र ठरणार आहेत.

याबाबतचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे कला गुण मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, आता त्यासंदर्भातील संभ्रम बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे दूर झाला आहे. अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडाचे गुणही मिळणार आहेत.

दरवर्षी दहावीत कला आणि क्रीडा क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यांच्या कामगिरीप्रमाणे विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात, ज्याचा उपयोग त्यांना आपल्या या क्षेत्रातील पुढील करिअरसाठी तर होतोच शिवाय दहावीच्या निकालात गुणपत्रिकांतही निश्‍चितच होतो. एकीकडे यंदा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या नाहीत तरी त्यांच्या मागील कामगिरीवरून ते गुण देण्याचा निर्णय देण्यात येतो, तर दुसरीकडे कला गुणांचे प्रस्ताव सादर करूनही सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले जात असल्याने शिक्षण विभाग दुजाभाव करीत असल्याची टीका होत होती. यासंदर्भात अनेक निवेदनेही शिक्षण विभाग आणि राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपला आधीचा निर्णय अधिक्रमित करून बुधवारी (16 जून) नवा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे ‘कला’ गुण
लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही

सवलतीचे कला गुण

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यास 7 गुण.

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत बी ग्रेड मिळाल्यास 5 गुण.

इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत सी ग्रेड मिळाल्यास 3 गुण.

तसेच विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळत नाहीत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com