आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
महाराष्ट्र

आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

नवाब मलिक यांची माहिती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या आयटीआयमधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. Maharashtra Skill Development Minister Nawab Malik

आयटीआय प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील 417 शासकीय व 569 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील 84 व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण 6 हजार 868 तुकड्यांमधून एकूण 1 लाख 45 हजार 632 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यापैकी अमरावती विभागात 17 हजार 984, औरंगाबाद विभागात 19 हजार 244, मुंबई विभागात 19 हजार 948, नागपूर विभागात 28 हजार 136, नाशिक विभागात 29 हजार 500, पुणे विभागात 30 हजार 820 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी 19 ऑगस्टपर्यंत 2 लाख 55 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 21 हजार 585 विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केले असून त्यापैकी 2 लाख 07 हजार 285 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 48 हजार 518 विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास येत आहे असेही मलिक यांनी सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com