स्वाधार योजना, वसतिगृह प्रवेशाच्या अर्जासाठी मुदतवाढ

स्वाधार योजना, वसतिगृह प्रवेशाच्या अर्जासाठी मुदतवाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना (Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Scholarship Scheme) तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice Department) वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास दि. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली...

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयातील प्रवेश प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. एलएलबी (LLB), बीएड (B.Ed.) यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेले राउंड फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सीईटी विभागाने कळवले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणारे विद्यार्थी वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभांपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास दि. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे निर्गमित करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

नशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे , नंदुरबार व अहमदनगर या जिल्हयातील एकूण ५३ शासकीय वसतिग़ृहात मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रवेश दिला जाणार आहे. तरी व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्हयातील संबंधित मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातून अर्ज प्राप्त करावे व परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज दि .28 फेब्रुवारीपर्यंत वसतिगृहात सादर करावे.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज वितरण व स्विकृती सबंधित जिल्हाचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com