रिक्त पदांची माहिती देण्यासाठी मुदतवाढ

१० ते १२ विभागाकडून माहिती जमा
रिक्त पदांची माहिती देण्यासाठी मुदतवाढ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत Through Maharashtra Public Service Commission भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते. मात्र, ४५ विभागांपैकी जेमेतेम १० ते १२ विभागांनीच यासंदर्भातील माहिती दिल्याची बाब पुढे आली आहे. माहिती जमा करण्याची मुदत टळल्याने संबंधितांना आणखी आठवड्याची मुदत देण्यात येणार असून त्यानंतरही टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.

उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी प्रशासनातील १५ हजार रिक्त पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती करण्याची घोषणा केली असून त्यानुसार रिक्तपदांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. सुरूवातील देण्यात आलेली १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत वाढवून ती आता ३० सप्टेंबर करण्यात आली आहे. मात्र गुरूवारी ही मुदत संपत आली तरी ४३ पैकी दहा ते १२ विभाग सोडले तर इतर विभागांकडून पुर्ण माहिती जमा झालेली नाही.

एमपीएससीकडे माहिती जमा करणाऱ्यांमध्ये महसूल, गृह, राज्य उत्पादन शुल्क, कामगार, वित्त व लेखा, परिवहन, शिक्षण, तंत्रशिक्षण, कौशल्य विकास, वने, माहिती तंत्रज्ञान या विभागांचा समावेश असल्याचे समजते. उर्वरित विभागांची रिक्त पदांची माहिती अजूनही जमा झालेली नसून ही माहिती जमा करण्यासाठी संबंधित विभागांची धावपळ सुरू आहे.

आता राज्य सरकार रिक्त पदांची माहिती जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देणार की नाही याविषयी अधिकृतरित्या काहीही जाहीर करण्यात आले नसले तरी सरकार आणखी आठवड्यभराची मुदत देणार असल्याचे कळते. मात्र त्यानंतरही दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.