1 जूननंतर दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी; व्यापाऱ्यांची मागणी

1 जूननंतर दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी; व्यापाऱ्यांची मागणी

पुणे(प्रतिनिधि)

सध्या राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुकानांची वेळ ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आहे. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून व्यापाऱ्यांवर जवळपास 70 टक्के परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे 1 जूननंतर दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी, व्यापारी करीत आहेत.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे 1 जूनपासून सर्व प्रकारच्या दुकानांची वेळ वाढवावी अशी मागणी मार्केट यार्डातील भुसार व्यापारी करत आहेत. किराणा दुकानं सकाळी फक्त अकरा वाजेपर्यंत सुरु असतात, त्याचबरोबर जिल्हाबंदी असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांना खरेदीसाठी मार्केटयार्डात येणे शक्य होत नाही. याचा आर्थिक फटका मार्केट यार्डातील भुसार व्यापाऱ्यांना बसत आहे.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून व्यापाऱ्यांवर जवळपास 70 टक्के परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने नियमांसह दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवल्यास व्यापाऱ्यांचे हाल होतील, असं कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी याआधीही म्हटले होते.

यापूर्वी पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 31 मेपर्यंत दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने 1 जूनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एफआरटीडब्ल्यूचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com