‘या’ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

पुणे विद्यापीठाचा निर्णय
‘या’ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

पुणे - कोविड-19 महामारीमुळे आपले पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी करोना संसर्गामुळे ज्यांचे आई-वडिल मृत्यू पावले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव बैठकीत मान्य करण्यात आला.

दरम्यान, सध्या विद्यापीठाच्या द्वितीय सत्राची परीक्षेचे नियोजन सुरू आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी शुल्कासह अर्ज करीत आहेत. परीक्षा अर्ज भरण्याची मुदत दि. 27 जूनपर्यंत आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.

काही विद्यार्थी अर्ज करीत आहेत. अशा स्थितीत करोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. ज्यांनी शुल्क भरले असतील, त्यांना परीक्षा शुल्क परत दिले जाणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशा विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती आहे, त्याची माहिती संकलित करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीत सर्वच विषयावर वेळेअभावी निर्णय होऊ शकले नाहीत. त्यामुळे पुन्हा पुढच्या आठवड्यात परिषदेची बैठक होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com