नितेश राणेंना आणखी एक धक्का; अटकपूर्व जमीन मिळाला तरी...

नितेश राणेंना आणखी एक धक्का; अटकपूर्व जमीन मिळाला तरी...

सिंधुदुर्ग | Sindhudurg

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात (Sindhudurg District Court) अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मिळण्यासाठी नितेश राणे यांनी धाव घेतली आहे...

त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठी बुधवारी दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. याप्रकरणी गुरुवारी निकाल दिला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. नितेश राणेंना जामीन मिळणार की? अटक होणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष वेधले आहे. परंतु निर्णयाआधीच नितेश राणे यांना एक धक्का मिळाला आहे.

आ. नितेश राणेंना आता मतदानाचा (Voting) हक्क नाकारण्यात आला आहे. एकीकडे नितेश राणे अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात (Court) गेले असून त्यावर आज सुनावणी होत असताना दुसरीकडे या निर्णयामुळे त्यांना जामीन (Bail) मिळाला तरी मतदान करता येणार नाही.

सहकार विभागाने १६ कोटींच्या थकीत कर्जामुळे नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे नितेश राणे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com