नेवासा -

राज्यातील साखर कारखान्यांनी सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात बी-हेव्ही मोलासेस, शुगर सिरप (साखरेचा पाक) व ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती सुरू केल्याने राज्यात सुमारे 53 लाख 64 हजार 410 क्विंटल साखरेचे उत्पादन कमी होणार आहे.

अतिरक्त साखर उत्पादन,जागतिक बाजरपेठेतील साखरेच्या दरातील घसरण आणि एक रकमी एफआरपी च्या चक्रात सापडलेल्या साखर उद्योगाला साखरेचा पाक, ऊसाचा रस व बी-हेवी मोलासेस पासून थेट इथेनॉल निर्मिती वरदान ठरणारे आहे.

ऊसापासून साखर निर्मिती करणे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन संपूर्ण भारत देश आणि महाराष्ट्र राज्यातील साखर साखर उद्योगाची वाटचाल सुरू आहे.जो पर्यंत ऊस गळीतास आल्यापासून 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी दिलीच पाहिजे असा सरकारी बडगा नव्हता तो पर्यंत साखर उत्पादना व्यतिरिक्त अन्य उपपदार्थ निर्मितीकडे फारसे गांभीर्याने कधीच पाहिले गेले नाही.त्यामुळे ऊस गाळप करणे,साखर निर्मिती करणे आणि फार फार तर डिस्टिलरीच्या माध्यमातून अल्कोहोल निर्मित करणे हेच काम आजवर साखर कारखान्यानी केले.त्यामुळे ऊस बिल देणी आणि कामगारांचे पगार वेळेवर करणे ही मुस्किल झालेले आहे.

साखर आणि अल्कोहोल निर्मितीच्या पलीकडे जाऊन सहवीज निर्मिती प्रकल्प,इथेनॉल निर्मिती हे ही उपपदार्थ साखर कारखान्याना आर्थिक स्थैर्य देणारे ठरत आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच इथेनॉलच्या किंमतीत 25 टक्क्यांनी वाढ करून थेट उसाच्या रसापासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलचा दर 47.50 प्रति लीटर वरून 59.50 केला आहे तर बी हेव्ही मोलॅसीस पासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर 47.50 प्रतिलीटर वरून 52.43 केला आहे.

गेल्या इथेनॉल पुरवठा वर्ष 2018-19 मध्ये साखर कारखान्यांनी ऑइल उतपादन कंपन्यांना सुमारे 180 कोटी लिटर इथेनॉल पुरवठा तेल कंपन्यांना केले. ज्यामुळे ऑइल कंपन्या केवळ 5% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठू शकल्या. इथेनॉलला ऑइल कंपन्यांची पुरेशी मागणी आहे.केंद्र सरकार इथेनॉलचे दर ठरवत असल्याने साखर कारखानदारांना अतिरिक्त ऊस व साखर उत्पादन इथेनॉलकडे वळविण्यास काहीच अडचण उद्भवणार नाही. इथेनॉलचे उत्पादन करून ऑइल कंपन्याना ऑइल पुरवठा झाल्यास केवळ 3 आठवड्यांतच साखर कारखानदारांना पैसा उपलब्ध होतो. मात्र साखर उत्पादन करून साखर विक्रीतून मिळणारा पैसा मिळण्यास 12-15 महिन्यांचा कालावधी लागतो. उसाला इथेनॉलकडे वळविल्यास साखर कारखान्यांचा पैशाचा रोख प्रवाह (कॅश फ्लो) सुधारेल आणि उसाच्या थकीत देय रकमा वेळेवर देण्यास त्यांची मदत होईल.सध्या साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादनासाठी स्थापित क्षमता देखील वापरण्यात आलेली नाही.कारखान्यांनी इथॅनॉल तयार करण्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या क्षमतेचा किमान 85% क्षमतेचा वापर करावा असे ही केंद्राने सुचविले आहे.

साखर आयुक्तालया कडील उपलब्ध माहिती नुसार राज्यातील 59 साखर कारखान्यानी बी-हेव्ही मोलासेस,साखरेचा पाक व ऊसाचे रसापासून थेट इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे.या माध्यमातून सी-हेव्ही मोलासेस पासून 15 कोटी 10 लाख लिटर,बी-हेव्ही मोलासेस पासून 35 कोटी 83 लाख 70 हजार लिटर,शुगर शिरप पासून 11 कोटी 40 लाख लिटर व ऊसाचे रसापासून 3 कोटी 67 लाख 50 हजार लिटर अशी एकूण 66 कोटी 1 लाख 20 हजार इथेनॉल निर्मिती होणार आहे.त्यापैकी बी-हेव्ही मोलासेस,शुगर सिरप व ऊसाचे रसापासून 50 कोटी 91 लाख 20 हजार लिटर इथेनॉलची निर्मिती होऊन 53 लाख 64 हजार 410 क्विंटल साखर उत्पादन कमी होणार आहे.

राज्यातील विभाग निहाय होणारे इथेनॉल निर्मिती किलो लिटर्स व कमी होणारे साखर उत्पादन(क्विंटल)

विभाग-- सी-हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल(किलो लिटर्स)--बी-हेव्ही मोलासेस पासून इथेनॉल(किलो लिटर्स)--शुगर सिरपपासून इथेनॉल(किलो लिटर्स)--ऊसाचे रसापासून इथेनॉल(किलो लिटर्स)--साखर उत्पादनात होणारी घट(क्विंटल)

कोल्हापूर--35500--70000--9000--9750--650780

पुणे--33500--109600--45500--3000--1652771

सोलापूर--24500--99100--30000--11500--1317034

अ.नगर--41500--6000--18000--7500--1078504

औरंगाबाद--10000--28900--00000--00000--336141

नांदेड--6000--10000--5000--5000--180000

अमरावती--0000--3500--6500--0000--97180

नागपूर--0000--7270--0000--0000--52000

एकूण--151000--388370--114000--36750--5364410

नगर विभागातील (नगर-नाशिक जिल्हा) अंबालिक शुगर्स,व्दारकाधिश(सटाना) व गंगामाई शुगर हे 3 साखर कारखाने सी व बी हेव्ही मोलासेस पासून, डॉ.विखे पाटील साखर कारखाना (प्रवरा) हा कारखाना बी-हेव्ही मोलासेस व थेट शुगर सिरप पासून तर स.म.शंकरराव कोल्हे साखर कारखाना(कोपरगाव) हा कारखाना थेट ऊसाचे रसा पासून इथेनॉल निर्मिती करीत आहे.