पर्यावरण साहित्य संमेलन जानेवारीत जळगावात
महाराष्ट्र

पर्यावरण साहित्य संमेलन जानेवारीत जळगावात

Balvant Gaikwad

समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा आणि महाराष्ट्र शासन-साहित्य व संस्कृती विभाग यांच्या वतीने राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन दि. 31 जोनवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आले आहे.

पर्यावरण व शाश्वत विकास या विषयावरील लिखाणाला चालना मिळावी आणि या विषयावरील लेखनप्रभावीपणे समाजासमोर यावेत. असा मुख्य उद्देश या साहित्य संमेलनाचा आहे.

या साहित्य संमेलनासाठी पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात लिखाण करणारे साहित्यिक लेखक आणि वर्तमान पत्रातून लिखाण करणारे पत्रकार, स्तंभलेखक, संशोधन क्षेत्रातील कार्यकर्ते इ. आमंत्रित करण्यात येणार आहे.

तसेच पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रातील साहित्यिकांनची प्रकट मुलाखत, महाविद्यालय आशि शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, संशोधन पध्दती, स्तंभलेखन पेपर लिखाण, ललित लेखनावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पर्यावरण आणि निसर्ग साहित्यातून रचनात्मक जनआंदोलन या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनावर आधारित कविता आणि कथाकथनाचे सादरीकरण, परिसंवाद, शोध निबंधांचे वाचन, पथनाट्य सादरीकरण असे बहुविध उपक्रम सादर करण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, इतर साहित्यिक असे तीन गट करण्यात आले आहेत. या तिन्ही गटात सादरीकरणाची संधी प्रतिभावान नवोदित शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिक साहित्यिकांना मिळणार आहे. 18 जानेवारी रोजी साहित्य संमेलनाची निवड फेरी होणार आहे. काव्यवाचन, कथाकथन, परिसंवाद या कार्यक्रमांचाही यात समावेश सहणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com