माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची छापेमारी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची छापेमारी

नागपूर | Nagpur

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ED) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. ईडीसोबत केंद्रीय सुरक्षा पथक देखील दाखल झाले आहेत. या छापेमारीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात नसून ते मुंबईत असल्याचं कळतंय.

गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे.

देशमुखांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या तुकड्याही तैनात आहेत. या छापेमारीदरम्यान ईडीसोबत पॅरामिलिटरी दलाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा समावेश आहे. सध्या नागपुराच्या घरात देशमुखांचा मुलगा सलील देशमुख, सून, आणि पत्नी घरी असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com