माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची पुन्हा छापेमारी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची पुन्हा छापेमारी

मुंबई l Mumbai

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ED ने त्यांच्या नागपुरमधील घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ED ने त्यांच्या काटोल व वडविहिरा मधील घरावर (Nagpur Katol Vadvihira Residence) कारवाई केली आहे.

नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर असून ED च्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे ईडी अनिल देशमुख यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, या आधी ED ने अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची ४.२० कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे. यात मुंबई येथील वरळी परिसरातील एका घराचाही समावेश होता. प्राप्त माहितीनुसार ईडीने पीएमएलए प्रकरणी ही कारवाई केली. जप्त संपत्तीत मुंबई येथील एका फ्लॅटसह रायगड येथील त्यांच्या २.६७ कोटी रुपयांच्या जमीनीचाही समावेश आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला होता की, देशमुख यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पदावर असताना बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या माध्यमातून मुंबई येथील बार आणि रेस्टॉरंट (Bars and restaurants) मालकांकडून प्रतिमहिना १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, विशेष पीएमएल न्यायालयाने ६ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना मंगळवारी २० जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देशमख यांच्या विरुद्ध १०० कोटी रुपयांची लाच माहितल्याच्या आरोप प्रकरणी चौकशी सुरु आहे. हे प्रकरण आता ED कडे सोपविण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com