कर्मचारी बंधू, भगिनींनो संप थांबवा कारण...; एसटी महामंडळाचे भावनिक पत्र

कर्मचारी बंधू, भगिनींनो संप थांबवा कारण...; एसटी महामंडळाचे भावनिक पत्र

मुंबई | Mumbai

एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. एसटी सेवा बंद असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फटका बसला आहे...

अखेर आज एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन (ST Workers Strike) मागे घेण्याचे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचा संचित तोटा हा १२ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे.

संपामुळे दररोज सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. याचा परिणाम महामंडळाला आणि परिणामी एसटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने संप मागे घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

एकीकडे एसटी महामंडळातर्फे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. २ हजारच्यावर एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाईदेखील महामंडळाने केली आहे. दुसरीकडे चर्चेची दारे खुली आहेत, असे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले आहे. मात्र एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीवर एसटी कर्मचारी अद्याप ठाम आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com