निवडणुकीच्या प्रशिक्षणास कर्मचार्‍यांची दांडी
महाराष्ट्र

निवडणुकीच्या प्रशिक्षणास कर्मचार्‍यांची दांडी

Balvant Gaikwad

नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 गट व 20 गणांच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले होते. कर्मचार्‍यांचे आज पहिल्या टप्यातील प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान 55 कर्मचारी गैरहजर होते. त्यांच्यावर कारवाईचा इशारा सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी वसुमना पंत यांनी दिला.

नंदुरबार तालुक्यातील एकूण जिल्हा परिषदेसाठी 10 गट व पंचायत समितीसाठी 20 गण आहेत. यासाठी तालुक्यात 224 मतदान केंद्राची नेमणूक करण्यात आली.

तालुक्यात एकूण 1 लाख 98 हजार 295 एवढे मतदार आहेत. नंदुरबार तालुक्यातील 224 मतदान केंद्रावर 1200 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्त कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण वर्ग आज दि. 22 डिसेंबर रोजी शहरातील संजय टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. दोन टप्यात प्रशिक्षण घेण्यात आले.

या पहिल्या टप्यात 600 कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यात 30 कर्मचारी गैरहजर होते व दुसर्‍या टप्यातील प्रशिक्षणासाठी 600 कर्मचार्‍यांपैकी 25 कर्मचारी गैरहजर होते.

नंदुरबार येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गात सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती वसुमना पंत व तहसिलदार तथा सहायक निवडणुक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत पहिल्या टप्यातील तर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत दुसर्‍या टप्यातील प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणा दरम्यान नियुक्त कर्मचार्‍यांसाठी टपाली मतपत्रिका अर्ज नमुना 12 उपलब्ध करून देण्यात आला. अनुपस्थितीत कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com