मच्छीमार बांधवांना अल्पदारात कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे आश्वासन

मच्छीमार बांधवांना अल्पदारात कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई । प्रतिनिधी

तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना अल्पदारात कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई बॅंक सकारात्मक सहकार्य करेल, असे आश्वासन विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी दिले.

कोळी महाराष्ट्र संघ आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज दरेकर यांची आपल्या मागण्यांसाठी भेट घेतली. राज्यातील विविध मच्छिमार संघटनांच्या बहुतांश सदस्यांची बॅंक खाती ही मुंबई बॅंकेत आहेत. त्यामुळे या सदस्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य प्रक्रिया करुन त्यांना मदत करण्यात येईल, असे दरेकर यांनी सांगितले.

तौक्ते चक्रिवादळात मच्छिमारांच्या बोटींचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये लहान बोटींसह मोठ्या बोटींचाही समावेश आहे, त्यामुळे या मोठया बोटींना केंद्राच्या पंतप्रधान मत्स्य योजनेमार्फत लाभ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. तर प्रकल्पाची उर्वरित रक्कम मुंबई जिल्हा बॅक उपलब्ध करील. मुंबईत ५१ बोटी पूर्ण निकामी आहेत. त्यांना किमान अवश्यक ६ ते ७ कोटी रुपयांची व्यवस्था करण्यासाठी अर्थसहाय्य जिल्हा बॅक करेल, असे आश्वासनही दरेकर यांनी दिले.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रसाद लाड, आमदार रमेशदादा पाटील, महाराष्ट्र कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, मच्छीमार सोसायटीचे उपाध्यक्ष प्रल्‍हाद कोळी, सुनील कोळी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com