40 कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर अविनाश भोसले यांना ईडीचे पुन्हा समन्स

40 कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर अविनाश भोसले यांना ईडीचे पुन्हा समन्स

पुणे / Pune - पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (builder Avinash Bhosale) यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता काही दिवसांपूर्वीच सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED)) जप्त केली आहे. आता मनी लाँड्रिंग प्रकरणी भोसले यांना पुन्हा ईडीने समन्स बजावले आहेत.

ईडीने आज 1 जुलै रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, भोसले यांच्या मुलाला देखील ईडीने समन्स बजावले आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अविनाश भोसले यांची याआधी देखील चौकशी करण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याला देखील समन्स बजावले आहे. अमित भोसलेला उद्या 2 जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसले यांनी पुण्यात निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारत बांधल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे. Money Laundering Act (PMLA)

भोसले यांनी संबंधित जमीन खरेदीसाठी बेकायदा व्यवहार केल्याचा ही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, ईडीने गुन्हा रद्द करावा यासाठी अविनाश भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने दिलासा न देता चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत.

40 कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर अविनाश भोसले यांना ईडीचे पुन्हा समन्स
बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com