बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त

ईडीची मोठी कारवाई
बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई - पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे. Enforcement Directorate (ED)

ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती. मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. Foreign Exchange Management Act (FEMA)

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले हे ईडीच्या रडारवर होते. विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999(फेमा) कायद्याअंतर्गत ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. यानंतर आता ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. builder Avinash Bhosale

कोण आहेत अविनाश भोसले?

नगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले. त्यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली. पुण्यातील रास्ता पेठ भागात भाड्याच्या घरात राहून अविनाश भोसले यांनी रिक्षा व्यवसाय सुरु केला. अल्पावधीत रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. त्यानंतर अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणार्‍यांशी झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेतली. त्यानंतर बांधकामा क्षेत्रामध्ये मोठं नाव त्यांनी कमावले. सध्या कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा प्रवास आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांचे सासरे आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागामध्ये त्यांच्या एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने 103 कोटी 80 लाख रुपयांना स्थावर मालमत्तेची खरेदी केल्याची माहिती समोर आली होती

यापूर्वी दंडात्मक कारवाई

दरम्यान, ईडीने यापूर्वी अविनाश भोसले यांच्यावर फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला होता. 2007 मध्ये अमेरिका आणि दुबई दौरा करुन भारतात येताना परकीय चलन आणि महागड्या वस्तू कस्टम ड्यूटी न भरता चोरून आणल्याबद्दलही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. यापूर्वी त्यांची मुंबईत चौकशी सुरू होती. आता पुण्यातल्या कार्यालयात ईडीने चौकशी सुरु केली आहे. 2017 साली इन्कम टॅक्स विभागाने अविनाश भोसले यांच्या घरी छापा टाकल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले होते.

बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त
लस घेण्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी अनिवार्य नाही
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com