ED ची राज्यातील विविध भागात मोठी कारवाई; 'इतक्या' कोटी किंमतीच्या एकूण 70 मालमत्ता जप्त
मुंबई | Mumbai
राज्यभरात ईडीने (Enforcement Directorate)मोठी कारवाई करत दणका दिला आहे. ईडीने केलेल्या कारवाईत ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे ३१५ कोटीच्या आसपास आहे. ईडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने काही महिन्यापूर्वी गुन्हे दाखल केले असून त्या आधारावर ईडीकडून मनीलाँड्रीग प्रकरणाचा तपास सुरू होता. या तपासात मनी लाँड्रींग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.
आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणि आहे. इतरांनी मिळवलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे. ED ने जळगाव, आणि ठाणे येथील राजमल लखीचंद समूहाच्या १३ ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत गुन्हेगारी कागदपत्रांसह सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने/सराफा आणि भारतीय चलन जप्त करण्यात आले.