मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलचा गौप्यस्फोट

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलचा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या ड्रग्स प्रकरणातील (Drugs Racket) माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil Arrested) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ललित पाटिलला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ललित पाटील याने धक्कादायक दावा केला आहे.

मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवलं गेल्याचा गौप्यस्फोट ललित पाटीलने केला आहे. रूग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले असता ललित पाटीलने दावा केला आहे की मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवण्यात आले होते. यामागे कुणाकुणाचा हात आहे, हे मी सगळे सांगणार आहे, असे ललित पाटील म्हणाला.

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलचा गौप्यस्फोट
गाझातील रुग्णालयावरील भीषण स्फोटात ५०० जणांचा मृत्यू; पॅलिस्टिनकडून इस्रायलवर गंभीर आरोप

त्यानंतर पोलिसांनी ललित पाटीलला लगेच रुग्णालयात नेले. मात्र, ललित पाटीलच्या या वक्तव्यामुळे नव्या वादामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ललित पाटील याला रुग्णालयातून पळवण्यात कोणाचा हात होता? त्याला राजकीय संरक्षण होते का? याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

दरम्यान, ड्रगमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्याआधीच ललित आणि त्याच्या साथिदाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तो श्रीलंकेला जाण्याआधीच त्याला साकीनाका पोलिसांनी पकडला. ललित पाटीलला बंगळुरूमधून पळून जाताना अटक करण्यात आली. . ललित पाटील आणि त्याच्या साथीदाराला अंंधेरी कोर्टात हजर केले जाणार आहे.

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं; ललित पाटीलचा गौप्यस्फोट
Lalit Patil Arrested : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले.

ललित पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला

मुंबईच्या साकीनाका पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीला ललित पाटीलने नव्या नंबरवरून कॉल केला आणि तिथेच तो फसला. त्यानंकर साकीनाका पोलीसांनी तीन पथके ललित पाटीलच्या शोधासाठी तयार केली. या दरम्यान ललित पाटील आणि ताब्यात असेलल्या आरोपीचे रोज संभाषण होत असे.

त्यांच्या संभाषणावरुन पोलिसांना ललित पाटीलच्या हालचालींविषयी माहिती मिळत होती. पुणे, नाशिक, इंदोरवरून तो सुरतमध्ये गेला. त्यानंतर पुन्हा नाशिक, धुळे, औरंगाबाद करत कर्नाटकातमध्ये गेला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात होता. अखेर एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com