भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डाॅ.भारती पवार

तर प्रा.फरांदे महामंत्री
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डाॅ.भारती पवार
भाजप कार्यकारिणी303404198066101

नाशिक । भाजपची राज्य कार्यकारणीच्या घोषणेची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली असून त्यात दिंडोरी लोकसभा खासदार डाॅ.भारती पवार यांना प्रदेश उपाध्यक्ष तर नाशिकमध्यच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे यांना महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रदिप पेशकार, तुषार भोसले व प्रविण अलई या नाशिकच्या चेहर्‍यांना स्थान देण्यात आले आहे.

दर तीन वर्षांनी पक्षात राष्ट्रिय ते स्थानिक पातळिवर संघटनात्मक बदल केले जातात. त्यानुसार राज्य कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून शुक्रवारि (दि.३) घोषणा करण्यात आली.

त्यात उपाध्यक्ष, महामंत्री, संघटन महामंत्री, कोषाध्यक्ष, महिला, युवा, अल्पसंख्यांक, अनुसुचित जाती जमाती आदि पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांसह अनेक नेत्यांना या कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. नाशिकच्या पाच चेहर्‍यांचा त्यात समावेश आहे. दिंडोरी लोकसभा खासदार डाॅ.भारती पवार यांना प्रदेश उपाध्यक्ष तर नाशिकमध्यच्या आमदार प्रा.देवयानी फरांदे यांना महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, प्रदिप पेशकार यांची उद्योग व व्यवसाय सेलचे प्रकोष्ठ संयोजक पदी निवड करण्यात आली आहे. आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ पदावर आचार्य तुषार भोसले तर सोशल मीडिया संयोजक पदी प्रविण अलई यांची नियुक्ती करण्यात आलि आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com