प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांड

प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांड

पुणे (प्रतिनिधी) / Pune - चाकण येथील करंजविहीरे गावात प्रेम प्रकरणावरून दुहेरी हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी काम करतो त्या मालकाच्याच मुलीला पळवून नेल्याने आणि त्याला पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्याला लोखंडी रॉड, दांडके याने जबर मारहाण केली. तसेच, तापत्या सळईचे चटके दिले. यामध्ये या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रेयसी जखमी झाली आहे.

बाळू गावडे (26) आणि राहुल गावडे (28) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रियकर बाळू गावडे हा करंजविहीरे गावातील बाळू मरगज यांच्या वीटभट्टीवर कामाला होता. याच काळात बाळूचे वीटभट्टी मालकाच्या २१ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर बाळूने या मुलीला पळवून नेले. मुलीला पळवून नेल्यानंतर नातेवाईकांनी या दोघांचा शोध घेतला. त्यानंतर या दोघांना आणि यामध्ये मदत करणाऱ्याला रात्री उशिरा वीटभट्टी मालक बाळू मरगज यांच्या 'माणूसकी' या हॉटेलवर नेऊन जबर मारहाण केली आणि तापत्या सळईचे दिले चटके दिले.

बाळू गावडे याचे लग्न झालेले होते. बाळुने त्या मुलीला पळवून नेले. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांना याचा राग अनावर झाला. यामध्ये बाळुला त्या मुलीला पळवून घेऊन जाण्यासाठी मदत केल्यामुळे राहुल गावडेला लोखंडी रॉड, दांडके याने जबर मारहाण केली. तसेच, तापत्या सळईचे चटके दिले. यामध्ये या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com