डॉक्टरनेच लावले महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे

डॉक्टरनेच लावले महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे

पुणे (प्रतिनिधि) / Pune - पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. हे कॅमेरे याच विद्यापीठातील एका एम. डी. डॉक्टरने लावल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. सुजीत जगताप (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित जगताप हे एमडी आहेत. त्यांचा पुण्यातील हिराबाग येथे मोठा दवाखाना आहे. ते भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉस्पीटलमध्ये लेक्चर घेण्यासाठी देखील जात होते. दरम्यान, यातील फिर्यादी एका हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत. त्या परिसरातील क्वॉर्टरमध्ये एका मैत्रिणीसीबत राहतात. नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर त्या सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास रूमवर परत आल्या. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर लाईट लावली. पण, तो बल्ब लागला नाही. बल्ब पाहिला असता तो काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली.

त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला, तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीत यादव (या तपास करत होत्या. गेल्या 4 दिवसांपासून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तसेच येथील सुरक्षा रक्षक आणि फिर्यादी यांना संशय वाटत असलेल्या व्यक्तींकडे चौकशी करत होते.

यादरम्यान, एका ठिकाणी जगताप कैद झाले. त्यांना चौकशीसाठी बोलविल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com