मुंबई - सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील 4 हजार 899 शिक्षक आणि 6 हजार 159 शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 11 हजार 58 कर्मचार्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
मागील महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणार्या शासन मान्य व अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील 11 हजार 58 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.