केंद्राच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण - आरोग्यमंत्री टोपे

आता 358 केंद्र
आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई -

केंद्र सरकारकडून राज्यात कोरोना लसीकरणासाठी लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप

केले जात आहे. दरम्यान केंद्राने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. राज्यात सर्वाधिक केंद्र मुंबईत (50) असून त्यापाठोपाठ पुणे (39) ठाणे (29) या शहरांमध्ये लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. मुंबईसाठी 1 लाख 39 हजार 500 तर पुण्यासाठी 1 लाख 13 हजार डोस वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील 358 केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे 35 हजार आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यात येईल. 16 जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतील कूपर रुग्णालय या दोन ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री संवाद साधतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला कोरोना लशींचे वाटप केले जात असून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात 9 लाख 63 हजार लशींचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात 9 हजार डोस, अमरावतीसाठी 17 हजार, औरंगाबाद-34 हजार, बीड-18 हजार, बुलढाणा-19 हजार, धुळे-12 हजार 500, गडचिरोली 12 हजार, गोंदिया 10 हजार, हिंगाली 6 हजार 500, जळगाव-24 हजार 500, लातूर-21 हजार, नागपूर-42 हजार, नांदेड-17 हजार, नंदुरबार-12 हजार 500, नाशिक-43 हजार 500, मुंबई-1 लाख 39 हजार 500, उस्मानाबाद-10 हजार, परभणी-9 हजार 500, पुणे-1 लाख 13 हजार, रत्नागिरी-16 हजार, सांगली-32 हजार, सातारा-30 हजार, सिंधुदुर्ग-10 हजार 500, सोलापूर-34 हजार, वर्धा-20 हजार 500, यवतमाळ-18 हजार 500, अहमदनगर-39 हजार, भंडारा-9 हजार 500, चंद्रपूर-20 हजार, जालना-14 हजार 500, कोल्हापूर-37 हजार 500, पालघर-19 हजार 500, रायगड-9 हजार 500, ठाणे-74 हजार, वाशिम-6 हजार 500 अशा प्रकारे वाटप करण्यात आले आहे.

सुधारित लसीकरण केंद्रांची संख्या अशी : अहमदनगर-15, अकोला-4, अमरावती-6, औरंगाबाद-13, बीड-6, भंडारा-4, बुलढाणा-7, चंद्रपूर-8, धुळे-5, गडचिरोली-5, गोंदिया-4, हिंगोली-3, जळगाव-9, जालना-6, कोल्हापूर-14, लातूर-8, मुंबई-50, नागपूर-15, नांदेड-6, नंदुरबार-5, नाशिक-16, उस्मानाबाद-4, पालघर-6, परभणी-4, पुणे-39, रायगड-5, रत्नागिरी-6, सांगली-12, सातारा-11, सिंधुदुर्ग-4, सोलापूर-13, ठाणे-29, वर्धा-8, वाशिम-4, यवतमाळ-6 असे एकूण 358 केंद्र करण्यात आली आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com