सचिन वाझे यांचे ऑपरेटर कोण?

देवेंद्र फडणवीसांचा सवाल
सचिन वाझे यांचे ऑपरेटर कोण?

मुंबई | Mumbai

परमबीर सिंह आणि सचिन वाझे तर, खूप लहान नाव आहे. मात्र, यांच्यामागे कोण बड्या हस्ती आहेत, यांची नावे समोर आली पाहिजे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे तर, खूप लहान नाव आहे. मात्र, यांच्यामागे कोण बड्या हस्ती आहेत, यांची नावे समोर आली पाहिजे, सचिन वाझेंना वापरणारी माणसे महाविकास आघाडी सरकारमध्ये बसलेले आहेत, असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नुकतीच परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com