शेतकर्‍यांना समस्यामुक्त करण्याचा निर्धार - पंतप्रधान

कृषी क्षेत्राला बळकट करण्यात येणार
शेतकर्‍यांना समस्यामुक्त करण्याचा निर्धार - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी

अहमदाबाद/नवी दिल्ली -

शेतकर्‍यांना सर्व समस्यांमधून मुक्त करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला असून त्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. तसेच यासाठी कृषी क्षेत्राला

जास्तीतजास्त बळकट करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गुजरातमधील तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचे दिल्लीतून आभासी पद्धतीने लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. कृषी, आरोग्य सेवा आणि पर्यटन विकास असे हे तीन प्रकल्प आहेत.

शेतकर्‍यांचे उत्पन्न पुढील दोन वर्षांत दुपटीने वाढविण्याचा आणि त्यांना भेडसावणार्‍या समस्यांवर कायमचा तोडगा काढण्याचा माझ्या सरकारचा निर्धार आहे. या दिशेने आम्ही प्रयत्नांची गती वाढवली आहे. बदलत्या काळानुसार शेतकर्‍यांना शेती हा व्यवसाय वाटावा आणि यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळावे, यावर सरकारने नेहमीच भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना देशात कुठेही आपला माल विकण्याचे स्वातंत्र्य असावे, कृषी उत्पादन संघटना स्थापन करता यावी, रखडलेले सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावे, पीक विमा योजनेत सुधारणा किंवा शंभर टक्के नीम-कोटिंग युरियाचा वापर असो, हे सर्व काही शेतकर्‍यांना बळकट करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे आणि आमचे प्रयत्न सतत सुरूच राहणार आहेत, असे मोदी म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com