थोड बारीक व्हा; सर्वांसमोरच अजित पवारांचा पोलीस उपायुक्तांना सल्ला

थोड बारीक व्हा; सर्वांसमोरच अजित पवारांचा पोलीस उपायुक्तांना सल्ला
अजित पवार

पुणे | प्रतिनिधि

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत कार्यक्रमादरम्यान फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या. यावेळी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोरच पोलीस उपायुक्तांना ‘थोडं बारीक व्हा’ असा सल्ला दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्तालयातील डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर प्रातिनिधिक चावी स्वीकारण्यासाठी गेले.

अजित पवार यांनी चावी देत असताना, डीसीपी यांची तब्बेत पाहून बारीक व्हा असा सल्ला दिला. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पालिका अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, त्यानंतर डीसीपी काकासाहेब डोळे चावी घेऊन स्टेजवरुन खाली उतरल्यानंतर अजित पवार यासंबंधी पोलीस आयुक्त शिंदे यांच्यासोबत या विषयावर चर्चा करत होते. पोलिसांनी तंदरुस्त राहावं यासाठी आपण आर आर पाटलांच्या काळात पोलिसांसाठी फिटनेस भत्ता सुरु केला असं पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com