अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे

मुंबई । प्रतिनिधी

सारथी पाठोपाठ आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आलेल्या नियोजन विभागाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

हे महामंडळ यापूर्वी कौशल्य विकास, रोजगार आणो उद्योजकता विभागाकडे होते. मात्र, या महामंडळाची ध्येय आणि उद्दिेष्टे विचारात घेऊन हा विषय नियोजन विभागाकडे सोपविण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. अशावेळी मराठा समजाला सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दिलासा देण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी काही आर्थिक निर्णय घ्यावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर हे महामंडळ आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याकडे सोपविण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निकाल देत आरक्षण रद्द केल्याने या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, अण्णाआहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यापुरतीच चर्चा झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com