NDRF
NDRF
महाराष्ट्र

राज्यभरात NDRF च्या १६ टीम तैनात

मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर टीम तैनात

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

गेल्या दोन दिवसापासून मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १६ टीम राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मुंबईत ५, कोल्हापूर ४, सांगली २, सातारा १, ठाणे १, पालघर १, नागपूर १ व रायगड १ अशा एकूण १६ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या टीम राज्यातील विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com