जाती धर्माचा संघर्ष लोकशाहीसाठी घातक – मेधा पाटकर

जाती धर्माचा संघर्ष लोकशाहीसाठी घातक – मेधा पाटकर

संगमनेर (वार्ताहर) – भारतीय संविधानाची मूल्य पायदळी तुडविली जात असून जाती-धर्माच्या नावावर सुरू असलेला संघर्ष भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. भारतीय संविधान हे समग्र मानव जातीसाठीचा मानव ग्रंथ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.

संगमनेर येथे भास्कर नाना दुर्वे जन्मशताब्दीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजवादी नेत्या अ‍ॅड. निशाताई शिवूरकर, प्रदीप मालपाणी, राजाभाऊ अवसक, सीताराम राऊत, साथी युवराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते

मेधा पाटकर म्हणाल्या, देशात सध्या द्वेषाचा माहोल निर्माण केला जात आहे. समाजवादी कार्यकर्त्यांनी वास्तव समजून घेण्याची गरज आहे. देशात जाती धर्माच्या नावाखाली संघर्ष करून माणसे मारली जात आहेत. हे अत्यंत वेदनादायी आहे. या सरकारने ना कोणाला पंधरा लाख दिले ना कोणाला रोजगार दिला. समाजवादी कार्यकर्त्यांनी विरोधी विचारांना न घाबरता विचाराच्या धारेवर उभे राहण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन उभे राहण्याची गरज आहे. एकतेने या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले आहे. बहुमताच्या जोरावर मुस्लिम नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याची गरज आहे.

जची परिस्थिती गंभीर आहे. या सरकार विरोधाच्या लढाईत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. ज्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वासाठी प्रयत्न केला. सामान्य माणसांच्या सोबत उभे राहिले, त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. पण तुरुंगात गेलो तरी घाबरणार नाही. नागरिकता संशोधन कायदा हा मुस्लिमांवर उगारण्यासाठी हत्यार म्हणून वापर केला जाणार आहे. देशातील मुस्लिम आपल्या देशात राहून दहशतीखाली दिसत आहेत.आसाममध्ये सोळाशे कोटी रुपये खर्च करून नागरिकत्वाची नोंदणी केली आहे.

पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश काही राज्यांनी त्याकाळची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. या देशातील आदिवासीकडे कसला पुरावा मागतात. आचारात भ्रष्टाचार आणि भ्रष्ट विचाराच्या माणसांनी या देशातील सामान्य लोकांना देखील नागविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय नागरिकत्व संशोधन कायदा म्हणजे एक धर्म निर्मितीचा पाया आहे. यानिमित्ताने तो घालण्यास सुरुवात केली असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

देशात सर्वात मजबूत होत आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून जनतेमध्ये अभूतपूर्व एकच मग निर्माण होईल त्याचा परिणाम सरकारला भोगावे लागणार आहे आज शेतकर्‍यांच्या आत्महत्या लाखोंवर पोहोचत आहेत. शेतीची संस्कृती जीवंत ठेवणारे शेतकर्‍यांचे जीवन अडचणीत येता आले आहे. शेतकर्‍यांना विमा लुटला जात आहे. पण शेतकर्‍यांना विमा दिला जात नाही. अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. लोकशाहीचे स्तंभ ओळखले जात आहेत.

99 लढाई काश्मीर ते कन्याकुमारी असाच निर्माण करावा लागणार आहेत. त्यामुळे या लढ्यात अधिक भक्कम करावे लागणार आहेत. जनशक्ती हीच परिवर्तनाची शक्ती आहेत. सरकार कामगार विरोधी धोरणे राबवत असून राज्यस्तरावरील 100 व केंद्र सरकारचे 44 असे कायदेतज्ज्ञ रद्द करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

निशा शिवूरकर म्हणाल्या, देशात नागरिकत्व संशोधन कायदा संसदेने पारित केला तरी न्यायालयामध्ये तो कायदा टिकणार नाहीत. तो कायदा संविधानविरोधी आहे. राज्यघटनेतील तत्वे आणि मूल्य पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी समाजवादी कार्यकर्त्यांवर आहे. जगातील परिवर्तनशील कार्यकर्त्यांना लोकशाही समाजवाद हीच सावरेल, असे मत व्यक्त केले. यावेळी साथी युवराज, अ‍ॅड. मालपाणी यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सीताराम राऊत यांनी केले.

कार्यकर्त्यांना दिली शपथ
यावेळी नागरिक संशोधन कायद्यासाठी सरकारला हवी असलेली अभिलेख उपलब्ध करून न देण्याची व त्या विरोधात लढा उभारण्यासाठी संविधानावर विश्वास असलेली व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने उपस्थितांना उत्तर प्रदेश येथील समाजवादी युवाजन सभेचे अध्यक्ष साथी रिचा सिंग यांनी शपथ दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्यावतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आधार फाउंडेशनच्यावतीने कार्यकर्त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com