राज्याला प्रतिदिन ५० हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करावा

- राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची मागणी
राज्याला प्रतिदिन ५० हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करावा

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील करोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला प्रतिदिन २६ नव्हे तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज केली.

केंद्र सरकारने प्रतिदिन कोणत्या राज्याला किती रेमडेसीवीर वितरीत होणार याबाबत माहिती जाहीर केली आहे.या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला मिळणाऱ्या रेमडेसीवीरच्या संख्येबद्दल नवाब मलिक यांनी आक्षेप नोंदवला. केंद्राच्या माहितीनुसार महाराष्ट्राला फक्त २६ हजार इंजेक्शन मिळणार आहेत. कमी संख्येमुळे करोना संकट अधिक वाढेल, अशी भीती मलिक यांनी व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com