ओएनजीसी विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

- राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मालिक यांची मागणी
ओएनजीसी विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुंबई । प्रतिनिधी

तौक्ते चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळूनही ओएनजीसीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी केली.

तौक्ते चक्रीवादळाचा धोका असल्याचे सरकार आणि संबंधित यंत्रणेने जाहीर केले असताना ओएनजीसीने याकडे दुर्लक्ष करून ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला. त्यातील एक बार्ज बुडून ३७ कामगारांचा मृत्यू झाला तर अजूनही ४० कामगार बेपत्ता आहेत. शेकडो कामगार अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होते. त्यांना भारतीय नौदलाने आणि तटरक्षक दलाने सुखरुप बाहेर काढले. या घटनेला ओएनजीसी जबाबदार आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

दरम्यान काल बुधवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी चौकशी समितीची घोषणा केली. अशा चौकशी समितीने काहीही होणार नाही. या प्रकरणात जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com