रेमडेसिवीर साठा प्रकरणी गुन्हे दाखल करा

- ‘आप’च्या नेत्या प्रिती शर्मा यांची मागणी
रेमडेसिवीर साठा प्रकरणी गुन्हे दाखल करा
USER

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये सुरु असलेलल्या आरोप-प्रत्यारोपात आम आदमी पक्षानेही उडी मारली आहे. कोणताही राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषध खरेदी करु शकत नाही. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ‘आप’च्या नेत्या प्रिती शर्मा यांनी रविवारी केली.

शर्मा यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी म्हटले आहे की, भाजप नेते प्रसाद लाड हे भाजपच्या बाजूने दमणला जाऊन येऊन ब्रुक फार्मा यांना भेटून आले. या करता त्यांनी रेमडिसिवीरच्या आयातीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारचा वापर केला. तीच ताकद वापरून भाजपने ब्रुक फार्म यांच्याकडून रेमडिसिवीरचा साठा विकत घेतला.

राजकीय पक्ष हे निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतात, धर्मादाय आयुक्तांकडे नाही. कोणत्याही प्रकारच्या डोनेशनसाठी एखाद्या पक्षाने ड्रग्ज, औषध विकत घेणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे, असे प्रिती शर्मा म्हणाल्या.

फडणवीसांनी यांनी रेमडिसिवीर हे औषध चॅरिटी साठी खरेदी केल्याचे म्हटले आहे. म्हणूनच त्यांच्यावर, भाजपवर आणि त्यांच्या कार्यालयीन सदस्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश सरकारने द्यायलाच हवेत, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांकडून भाजपच्या नेत्यांना खास वागणूक दिली जात असल्याचा आरोप शर्मा यांनी केला. सामान्य नागरिकांना पोलिसांकडून भीतीची वागणूक मिळत असताना भाजप नेत्यांना मात्र खास वागणूक का दिली गेली? असा सवालही त्यांनी केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com